चिक्की घोटाळ्याविरुद्ध राष्ट्रवादीचे भद्रावतीत रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: July 1, 2015 01:24 IST2015-07-01T01:24:55+5:302015-07-01T01:24:55+5:30
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पावते) यांना २०६ कोटींच्या चिक्की खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,

चिक्की घोटाळ्याविरुद्ध राष्ट्रवादीचे भद्रावतीत रास्ता रोको आंदोलन
भद्रावती: महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पावते) यांना २०६ कोटींच्या चिक्की खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन ३० जूनला दुपारी १२ वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील पेट्रोलपंप चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा सदस्य अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुनाज शेख, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन एक तास चालले. यादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सुटका करण्यात आली. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विशेष न्यायिक आयोगामार्फत चौकशी करुन मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार भद्रावती यांच्यामार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
या आंदोलनात जयंत टेमुर्डे वरोरा, प्रदेश सचिव अमित उमरे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, शहर अध्यक्ष सुनिल महाले, निलेश ताजने, सुधाकर रोहनकर, प्रशांत काळे, किशोर पडवे, नरेंद्र सवई, अभिजीत भोगीरवार, नंदकिशोर वाढई, रामभाऊ देवईकर, विजय उमाटे, श्रीनिवास घुसपुल्ला यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)