नांदा फाटा येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार
By Admin | Updated: November 1, 2016 00:53 IST2016-11-01T00:53:12+5:302016-11-01T00:53:12+5:30
दिपावलीचे औचित्य साधून नांदा फाटा येथे राम जन्म उत्सव समिती व विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा ...

नांदा फाटा येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार
दिवाळीनिमित्त कार्यक्रम : एक दीप सैनिकांसाठी...!
नांदाफाटा : दिपावलीचे औचित्य साधून नांदा फाटा येथे राम जन्म उत्सव समिती व विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा यांच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सत्कार व ‘एक दीप सैनिकांसाठी...’ हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट आवळपूर वेल फेअर फाऊंडेशनचे मुख्य व्यवस्थापक मेजर आशिष पासबोला, कामगार संघाचे नेते काळे, साईनाथ बुच्चे, पोलीस उपनिरीक्षक तेलगोटे, आवळपूरच्या सरपंच सिंधूताई परचके, नांदाचे उपसरपंच पुरुषोत्तम अस्वले, लोकमत कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप, संजय मुसळे हे उपस्थित होते.
दिवाळी का यही पैगाम, रखो सैनिकोका सन्मान, या म्हणीचा आधार घेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपले जवान हे सीमेवर आपल्या सुरक्षेसाठी, देशातील नागरिकांची दिवाळी चांगली जावी, यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत व आपल्या देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, अशा जवानांचा सन्मान आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर पासबोला यांनी केले.
यावेळी आजी- माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यरत असलेले सैनिक बाबाराव उईके, धीरज ओझा, ओमप्रकाश कोठारी, कॅप्टन टिकम सिंह, सुबेदार राजकुमार, हिरामनी, छोटूलाल यादव, पी. सिन्हा, शयमवीर सिंह, केशव शौर्य, दानचंद्र भोरा, एस. टी. सिंह, होरन गोसाई, भुवन हजारीका, रणजित दार, भगवान सिंह या सैनिकांनाचा सत्कार करण्यात आला. शहीद सैनिकांना दीप लावून श्रध्दांजली वाहण्यात आली. सैनिकांना मदत म्हणून सहाय्य निधीसुद्धा गोळा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गुप्ता यांनी केले तर आभार नितेश मालेकर यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच ग्राम वासीयांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.