दाताळा उड्डाणपुलाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:22+5:302021-03-13T04:52:22+5:30

चंद्रपूर : इरई नदीवरील पुलाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...

Name the Datala flyover after Mother Jijau | दाताळा उड्डाणपुलाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्या

दाताळा उड्डाणपुलाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव द्या

चंद्रपूर : इरई नदीवरील पुलाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सावित्रीबाई फुले यांचे योगदान भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सर्वश्रुत आहे. भारतातील स्त्री शिक्षणाच्या त्या प्रणेत्या आहेत. त्यानी दलित, मुस्लीम आणि उपेक्षित समाजातील लोकांसाठी अपमान, तिरस्कार सहन केला आहे. त्यांच्या कार्याची जाणीव सर्व भारतीय लोकांच्या हृदयात आहे. म्हणून त्यांच्या कार्याची आठवण सदैव अनेक पिढींच्या स्मरणात राहावी, म्हणून इरई नदीवरील पुलाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजस खोब्रागडे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी चेतना बारसागडे, साक्षी दुर्गे, श्रावस्ती तावाडे, अभिजित तोतडे, भानेश चिलमिले, शुभम शेंडे, स्वप्नील बारसगडे, साहिल जुनघरे, हर्षल खोबरागडे आदी उपस्थित होते.

Web Title: Name the Datala flyover after Mother Jijau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.