राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नागपूर संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:32+5:302021-03-23T04:29:32+5:30

बल्लारपूर : येथील बहुउद्देशीय सेवा मंडळद्वारा आयोजित राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पेयर अकॅडमी नागपूर टीम व ...

Nagpur team wins state level leather ball cricket tournament | राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नागपूर संघ विजयी

राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नागपूर संघ विजयी

बल्लारपूर : येथील बहुउद्देशीय सेवा मंडळद्वारा आयोजित राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पेयर अकॅडमी नागपूर टीम व जैन फेब्रिकेशन जलगाव टीमच्या दरम्यान खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेयर अकॅडमी नागपूर हा संघ विजयी ठरला.

ही स्पर्धा येथील कॉलरी ग्राउंडवर घेण्यात आली. या स्पर्धेत आयपीएल व रणजीमधील खेळाडूंनी कोलकता, गोरखपूर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्र संघाकडून स्पर्धेत सहभाग घेतला. विजयी संघाला १ लाख ११ हजार १११ रुपयाचे पुरस्कार व उपविजेता संघाला ५५ हजार ५५५ रु. व ट्राफी अतिथीच्या हस्ते देण्यात आली.

अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुन्ना सिद्दीकी, संतोष महेश्वरी, राजू झोडे उपस्थित होते. दरम्यान बेस्ट बॅटसमेन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट किपर, बेस्ट फिल्डर यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मोतीलाल, उपाध्यक्ष चेतन गेडाम, सचिव शमीम सिद्दिकी, साजिद सिद्दीकी, कोषाध्यक्ष असलम शेख, अभिनव तिवारी, सल्लागार मसूर सिद्दीकी, नसीर बक्श, सागर रेड्डी, मुकीम सिद्दीकी उपस्थित होते.

Web Title: Nagpur team wins state level leather ball cricket tournament