शहर स्वच्छतेसाठी नगर पंचायतचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:31+5:302021-01-13T05:11:31+5:30

सिंदेवाही : स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत शहत स्वच्छतेसाठी सिंदेवाही नगर पंचायतने पुढाकार घेतला आहे. याबाबत जनजागृती ...

Nagar Panchayat initiative for city cleanliness | शहर स्वच्छतेसाठी नगर पंचायतचा पुढाकार

शहर स्वच्छतेसाठी नगर पंचायतचा पुढाकार

सिंदेवाही : स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत शहत स्वच्छतेसाठी सिंदेवाही नगर पंचायतने पुढाकार घेतला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी नगर पंचायतच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रविवारी नगर पंचायततर्फे शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅलीमध्ये नगर पंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी, शहरातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यात माझी वसुंधरा मोहीम राबविण्यात येत आहे. ३ जानेवारीला सावित्रीबाई जयंतीचे औचित्य साधून सिंदेवाही नगर पंचायतर्फे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी रविवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर नगर पंचायतच्या प्रांगणात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आशा गंडाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, गटनेता नरेंद्र भैसारे, माजी बांधकाम सभापती सुरेश पेंदाम, सभापती नंदा बोरकर, नगरसेवक भूपेश लाखे, युनूस शेख, प्रा.डॉ. रिजवान शेख, प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा.डॉ. नालावडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सांगुळे, विनय खोब्रागडे, प्राचार्य संगीता यादव, कावळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक न.प. अधीक्षक पंकज आसेकर संचालन युनूस शेख तर आभार सुधाकर निकुरे यांनी मानले.

Web Title: Nagar Panchayat initiative for city cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.