शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते.

ठळक मुद्देसंपर्कातील अडथळे होणार दूर : एफटीटीएच सेवा देण्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आले. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायतींना जोडण्याचे काम केले जात आहे.भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते. परंतु, सध्या केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. जिल्ह्याचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. बीएसएनएलचे राज्यात पाच हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये एक लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर तीन हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची ३ जी सेवा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपूरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर व गडचांदूर येथे सुरू करण्यात आली. ही सेवा चिमूर, नागभीड, गोंडपिपरी, सिंदेवाही व राजुरा येथही सुरू लवकरच होणार आहे. नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रा. पं. जोडल्या आहेत. उर्वरित ५०५ ग्रा. पं. ला जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. एफटीटीएच सेवेसाठी चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर असणाºया पूणे जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन तर जिल्ह्यात ६५० च्या सुमारे कनेक्शन आहेत. इतरत्र बीएसएनएल असअतानाच गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएल फायद्यात आहे, अशीही माहिती महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली. गडचिरोलीत तीन लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्यांच्या पाठोपाठ चार हजार लॅन्ड लाईन तर १२०० ब्रॅन्डबँड कनेक्शन आहेत. महिन्याला एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे.लोकाभिमुख सेवेला प्राधान्यदूरसंचार क्षेत्रात मागील दहा वर्षांत खासगी कंपन्यांनी शिरकाव केला. याकरिता केंद्र सरकारचेच धोरण कारणीभुत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांना लोकाभिमुख सेवा देण्यासाठी दुरसंचार विभागाने पाऊल उचलले. एफटीटीएच सेवा लवकरच सुरू आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत