NAFN service will be available to 324 Gram Panchayats | ३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा
३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा

ठळक मुद्देसंपर्कातील अडथळे होणार दूर : एफटीटीएच सेवा देण्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आले. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायतींना जोडण्याचे काम केले जात आहे.
भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते. परंतु, सध्या केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. जिल्ह्याचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. बीएसएनएलचे राज्यात पाच हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये एक लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर तीन हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची ३ जी सेवा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपूरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर व गडचांदूर येथे सुरू करण्यात आली. ही सेवा चिमूर, नागभीड, गोंडपिपरी, सिंदेवाही व राजुरा येथही सुरू लवकरच होणार आहे. नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रा. पं. जोडल्या आहेत. उर्वरित ५०५ ग्रा. पं. ला जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. एफटीटीएच सेवेसाठी चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर असणाºया पूणे जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन तर जिल्ह्यात ६५० च्या सुमारे कनेक्शन आहेत. इतरत्र बीएसएनएल असअतानाच गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएल फायद्यात आहे, अशीही माहिती महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली. गडचिरोलीत तीन लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्यांच्या पाठोपाठ चार हजार लॅन्ड लाईन तर १२०० ब्रॅन्डबँड कनेक्शन आहेत. महिन्याला एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे.

लोकाभिमुख सेवेला प्राधान्य
दूरसंचार क्षेत्रात मागील दहा वर्षांत खासगी कंपन्यांनी शिरकाव केला. याकरिता केंद्र सरकारचेच धोरण कारणीभुत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांना लोकाभिमुख सेवा देण्यासाठी दुरसंचार विभागाने पाऊल उचलले. एफटीटीएच सेवा लवकरच सुरू आहे.


Web Title: NAFN service will be available to 324 Gram Panchayats
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.