नाफेडतर्फे चणा खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:32 IST2019-03-20T22:31:21+5:302019-03-20T22:32:05+5:30
भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात ७५ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शासनामार्फत शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमालाच्या विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ११ तालुक्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.

नाफेडतर्फे चणा खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात ७५ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शासनामार्फत शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमालाच्या विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ११ तालुक्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील ११ तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना चना खरेदीची नोंदणी करता येणार आहे. ज्या तालुक्यात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेले नाही. अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना चणा खरेदीची नोंदणी करण्यासाठी काही खरेदी केंद्रनिहाय तालुके जोडण्यात आलेले आहेत. भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरोरा येथील खरेदी केंद्रावर नोंदणी करता येईल. तसेच ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना चिमूर या खरेदी केंद्र्रावर तर चंद्रपूर, गोंडपिंपरी, मूल, पोंभूर्णा, सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना राजुरा येथील खरेदी केंद्रावर त्याचबरोबर कोरपना आणि जिवती या तालुक्यातील शेतकऱ्यांना गडचांदूर या खरेदी केंद्रावर चणा खरेदी नोंदणी करता येणार आहे. सदर खरेदी केंद्रावर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुकसह केंद्रावर जावून नोंदणी करावी.