श्यामनगरातील खुनाचे रहस्य उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:01:03+5:30

स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पियूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना अटक केली.

The mystery of the murder has been revealed in Shyamnagar | श्यामनगरातील खुनाचे रहस्य उलगडले

श्यामनगरातील खुनाचे रहस्य उलगडले

ठळक मुद्देदोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांनी घरातील वृद्धाचा लोखंडी रॉडने हल्ला करुन जीव घेतला. तब्बल चार महिन्यानंतर या खूचाच्या घटनेचे रहस्य उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर (३०), पियूष आनंद तांबे (१९) अशी अटकेतील युवकांनी नावे आहेत.
श्यामनगर येथे सपन फकिर हलदर (७०) हे राहत होते. त्यांची पाचही मुले बाहेरगावी राहतात. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. २९ ऑक्टोबर २०१९ ला त्यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची तक्रार त्यांचा नातेवाईक गौरव पियूष मंडल (२३) रा. बंगाली कॅम्प यांनी रामनगर पोलिसांत केली होती. स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग ऊर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पियूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी सपन हलदर यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. ाएलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय विकास मुंढे, पंडित वºहाडे, संजय वाढई, जावेद सिद्दीकी, प्रांजल झिलपे, नितीन यांनी घटनेचा छडा लावला.

Web Title: The mystery of the murder has been revealed in Shyamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.