मायलेकीचे अपहरण वनरक्षकावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 3, 2017 00:32 IST2017-06-03T00:32:11+5:302017-06-03T00:32:11+5:30

तालुक्यातील केळझर येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या तीन वर्षीय मुलीसह त्यांच्या पत्नीचे अपहरण केलञयाप्रकरणी...

Myelike kidnapping case registered against forest guard | मायलेकीचे अपहरण वनरक्षकावर गुन्हा दाखल

मायलेकीचे अपहरण वनरक्षकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: तालुक्यातील केळझर येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या तीन वर्षीय मुलीसह त्यांच्या पत्नीचे अपहरण केलञयाप्रकरणी वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल मंत्रिवार यांच्यावर मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या वनरक्षकाच्या बचावासाठी वनविभागातील काही वरिष्ठ वनकर्मचारी सर्कीय झाले आहे. तर मूल पोलीस वनरक्षक मंत्रीवार यांच्या शोधात फिरत आहे. परंतु अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
चंद्रपूर वनविभागातील बाबुपेठ बिटामध्ये वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले व वनरक्षक आणि पदोन्नती वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल मंत्रिवार यांच्याविरुद्ध मूल तालुक्यातील केळझर येथील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या डेंकापूरवार यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तीनवर्र्षीय मुलीसह पत्नीचे केळझर येथील रेल्वे स्थानकावरुन चारचाकी वाहनाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. मूल पोलिसांनी विशाल मंत्रिवार यांच्याविरुद्ध कलम ३६३ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Myelike kidnapping case registered against forest guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.