नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:26+5:30

आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकातून निघाला. जयंत टॉकीज, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

Muslim community march in Chandrapur against citizenship bill | नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभेमध्ये नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे. याविरुद्ध ऑल इंडिया तंजीम उलेमाए इस्लाम संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा असलेले फलक हातात घेत मोठया संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते.
आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकातून निघाला. जयंत टॉकीज, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर ऑल इंडिया तंजीम उलेमाए इस्लाम संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश महासचिव अहमद सिध्दीकी, हबीब दाऊद मेमन, अनवरी अली, खालीक कादर, प्रविण खोब्रागडे, सोहल शेख, कादर शेख, तहसीन रजा आदी उपस्थित होते.

Web Title: Muslim community march in Chandrapur against citizenship bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.