दगडाने ठेचून युवकाची हत्या, आरोपी अज्ञात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:53+5:302021-07-17T04:22:53+5:30
अमोल राहत असलेल्या घरापासून अवघ्या काही अंतरावर गावातच मृतदेह आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून आल्या. शेजारी ...

दगडाने ठेचून युवकाची हत्या, आरोपी अज्ञात
अमोल राहत असलेल्या घरापासून अवघ्या काही अंतरावर गावातच मृतदेह आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून आल्या. शेजारी रक्ताने माखलेला दगड होता. यावरून दगडाने ठेचून त्या युवकाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हत्या झाल्यानंतरही घरच्यांनी पोलिसांना कळविले नाही. यामुळे अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. युवकाचा मृतदेह गावात पडून असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मारेकऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. काही वर्षांपूर्वी सालोरी गावाच्या शिवारात एका इसमाची हत्या करण्यात आली होती, परंतु त्याच्याही मारेकऱ्याचा शोध अद्याप लागला नाही, अशी चर्चा परिसरात केली जात आहे. घटनेचा तपास शेगाव पोलीस करीत आहेत.