चांदगाव शिवारात महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:25 IST2018-08-24T00:24:07+5:302018-08-24T00:25:23+5:30

चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Murder of woman in Chandgaon Shivar | चांदगाव शिवारात महिलेची हत्या

चांदगाव शिवारात महिलेची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : चांदगाव शिवारात इंदू ईश्वर कुथे रा. टिळक नगर ब्रम्हपुरी (४६) या महिलेचा मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ब्रह्मपुरी टिळक नगर येथील रहिवाशी ईश्वर कुठे यांचे शेत चांदगाव शिवारात आहे. शेती कामासाठी ईश्वर कुथे हे इंदूला दररोज सकाळी दुचाकीने सोडून देत व सायंकाळी परत घेऊन येत होते. सकाळी सोडल्यानंतर ते आणण्यासाठी गेले असता इंदू शेतात बांधीच्या पाण्यात पडून असल्याचे दिसून आले. परिसरातील लोकांच्या सहाय्याने ताबडतोब रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इंदूच्या डोक्यावर असलेल्या गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनास्थळी इंदूचा मोबाइल आढळून आला. मात्र तिचा गवत कापण्याचा विळा सापडला नाही. यावरून इंदूची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी व ठाणेदार दीपक खोब्रागडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder of woman in Chandgaon Shivar

टॅग्स :Murderखून