प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST2021-08-15T04:29:34+5:302021-08-15T04:29:34+5:30

पूजा निलकुमार बागडे (पूजा रवींद्र सलामे) (२७) असे मृत महिलेचे तर विवेक ब्रह्मदास चौधरी (२६) रा. चिखलपरसोडी असे आरोपीचे ...

Murder of a married sweetheart by a lover | प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या

प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्या

पूजा निलकुमार बागडे (पूजा रवींद्र सलामे) (२७) असे मृत महिलेचे तर विवेक ब्रह्मदास चौधरी (२६) रा. चिखलपरसोडी असे आरोपीचे नाव आहे. पूजा ही चवडेश्वरी मंदिर परिसरात आपल्या आईसोबत भाड्याच्या घरी राहत होती. पूजाचे लग्न काही वर्षांपूर्वी चिखलपरसोडी येथील निलकुमार बागडे नामक व्यक्तीशी झाले होते. पण फारकत झाल्याने पूजा आईसोबतच नागभीड येथे राहायला आली होती. पूजाचा पती आणि विवेक हे एकाच गावचे असल्यामुळे त्यांचे संबंध होते. विवेक हा पूजाला नेहमीच लग्नासाठी तगादा लावत होता. याच कारणावरून शुक्रवारी पूजा आणि विवेकचे जोरदार भांडण झाले होते. राग अनावर झाल्याने शनिवारी पूजाची आई शौचास गेल्याची संधी साधून आरोपीने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला व पूजाला खाली पाडून चाकूने मान चिरून काढली. अति रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विवेकचे हे अमानुष कृत्य सुरू असताना शौचास गेलेल्या तिच्या आईला किंकाळी ऐकू आल्याने ती लगबगीने घरात गेली असता, चाकू कंबरेला खोचून विवेक मागील दाराने पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, आरोपी विवेक याने घटनेनंतर काही वेळातच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ४५२ सहकलम ३ (२) (व्ही), अ.जा.ज.अ.प्र.का.१९८९ अन्वये गुन्हा दाखल क) केला आहे.

140821\img_20210814_155722.jpg

आरोपी विवेक चौधरी

Web Title: Murder of a married sweetheart by a lover