आईला शिव्या देणाऱ्या मोठ्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:23+5:302021-03-04T04:54:23+5:30

मूल : दारू पिऊन आईला विनाकारण शिवीगाळ का करीत आहे, असे विचारणाऱ्या लहान भावाला मोठ्या भावाने लोखंडी सळाकीने मारण्याचा ...

Murder of elder brother cursing mother | आईला शिव्या देणाऱ्या मोठ्या भावाची हत्या

आईला शिव्या देणाऱ्या मोठ्या भावाची हत्या

मूल : दारू पिऊन आईला विनाकारण शिवीगाळ का करीत आहे, असे विचारणाऱ्या लहान भावाला मोठ्या भावाने लोखंडी सळाकीने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान भावानेच लोखंडी सळाक हिसकावून रागाच्या भरात मोठ्या भावावर पोटावर वार करून हत्या केली. ही घटना मूल तालुक्यातील मौजा केळझर येथे मंगळवारी रात्री घडली.

मृताचे नाव सुनील राजाराम मानकर (४०) असे आहे तर आरोपीचे नाव सुभाष राजाराम मानकर (३८) असे आहे. गिरजाबाई राजाराम मानकर यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मूल तालुक्यातील मौजा केळझर येथील गिरजाबाई राजाराम मानकर यांना गंगाधर, सुनील आणि सुभाष अशी तीन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा आणि लहान मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतात. सुनील हा गावातच राहत होता. तो नेहमीच दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत होता, दरम्यान, दहा दिवसांपूर्वी सुभाष हा केळझर येथे आला होता. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुनीलने आईला शिवीगाळ केली. सुभाषने त्याला हटकले. त्यानंतर सुनील सुभाषला मारण्यासाठी धावून आला असता सुभाषने सुनीलच्या हातातील सळाक हिसकावून सुनीलच्या पोटावर व पायावर वार केले. यात सुनीलचा मृत्यू झाला. मूल पोलीस घटनास्थळावर पोहचून आरोपी सुभाष मानकर यांच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Murder of elder brother cursing mother