शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मराशिपची सहविचार सभा

By Admin | Updated: March 13, 2016 01:02 IST2016-03-13T01:02:41+5:302016-03-13T01:02:41+5:30

मराशिप जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षक आमदार नागोजी गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालयात झाली.

Murashipachi Sahyog Sabha with Education Officer | शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मराशिपची सहविचार सभा

शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मराशिपची सहविचार सभा

तळोधी (बा) : मराशिप जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षक आमदार नागोजी गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर उपस्थित होते.
सदर सहविचार सभेत सन २०१३-१४ व १४-१५ या सत्रातील जिपीएफ पावत्या अनेक शाळांना प्राप्त झाल्या नाही. १ तारखेला कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे, चुकीच्या पद्धतीने झालेले समायोजन रद्द करणे, अप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, आमदार विकास निधीला होणारा विलंब, शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई, शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांशी वेतन पथक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून असभ्य वागणूक, आकसापोटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढी रोखणे, काही शाळातील शिष्यवृत्ती वाटपात झालेला गैरव्यवहार, मुख्याध्यापकाकडून जनगणना काळातील सुट्यांची नोंद सेवापुस्तीकेत करण्यात टाळाटाळ करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
या सहविचार सभेत जनता विद्यालय नेरी, इंदिरा गांधी विद्यालय टेकरी, सर्वांग विकास विद्यालय सावरगाव, महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव, ब्रह्मपुरी येथे २००५ मध्ये झालेले सर्वशिक्षा अभियान प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्राप्त झाली नाही. शिवाजी नाईट स्कूल राजुरा, शिवाजी विद्यालय राजुरा, शिवाजी विद्यालय कोंढा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, निरुपा विद्यालय रुई, संत हरदास विद्यालय भिंडाळा, इंदिरा गांधी विद्यालय जुनासुर्ला, आदर्श विद्यालय काजळसरा, सावित्रीबाई फुले विद्यालय गिरगाव, विद्याभूषण हायस्कूल, बाळापूर या शाळातील कर्मचाऱ्यांच्या प्राप्त तक्रारी तसेच २०१५-१६ चे संच निर्धारण व अतिरिक्त समायोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
या सहविचार सभेला आमदार नागो गाणार, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, वेतन पथक अधीक्षक गादेवार, जेऊरकर, मराशिपचे जिल्हा े पदाधिकारी मधुकर मुधीडकर, रामदास गिरटकर, विनोद वांढरे, हरिशचंद्र पाल, मनोहर झोडे, विलास वरभे, नरेंद्र राऊत, प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा सोनकुसरे, कार्यवाह विकास नंदूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Murashipachi Sahyog Sabha with Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.