आॅटोरिक्षा संघटनेतर्फे मुनगंटीवारांचा सत्कार
By Admin | Updated: October 12, 2015 01:33 IST2015-10-12T01:33:56+5:302015-10-12T01:33:56+5:30
महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.

आॅटोरिक्षा संघटनेतर्फे मुनगंटीवारांचा सत्कार
चंद्रपूर: महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील आॅटोरिक्षा चालकांची १९९७ पासूनचे परमिट नुतनीकरण होत नव्हते. त्या मागणीचा पाठपुरावा करुन तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत बैठक करुन आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे परिवहन मंत्री यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना मान्य करुन आॅटोरिक्षा चालकांना परमीट नुतनीकरण करण्याचे आदेश दिल्यामुळे आॅटो चालकात आनंदाचे वातावरण आहे. मागील २० वर्षापासून या मागणीसाठी बरेचदा आंदोलन केले. मोर्चे काढले. त्यामुळे नव्याने आदेश देवून आॅटोरिक्षा चालकाला होणारा त्रास मुक्त केल्याबद्दल मुनगंटीवार यांचा आॅटोरिक्षा चालकातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आॅटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हा सचिव बळीराम शिंदे, उपाध्यक्ष जहीर शेख, मधुकर राऊत, कुंदन रायपूरे, सुनिल धंधरे, बंडू भगत आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)