श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकपदी मुनगंटीवार

By Admin | Updated: May 3, 2017 00:45 IST2017-05-03T00:45:22+5:302017-05-03T00:45:22+5:30

अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज आश्रम येथील अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्त व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे.

Munigantiwar as the Director of Shri Gurudev Seva Mandal | श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकपदी मुनगंटीवार

श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकपदी मुनगंटीवार

चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज आश्रम येथील अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालकपदी राज्याचे वित्त व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या आमसभेत ही निवड सर्वांनुमते करण्यात आली.
या निवडीला ना. मुनगंटीवार यांनी सहर्ष स्वीकृती दिलेली आहे. या निवडीबद्दल सेवा मंडळाच्या वतीने चंद्रपुरात येऊन सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे गुरूजी, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, ग्रामगीता परीक्षा विभागाचे बंडोपंत बोढेकर आदींनी ना. मुनगंटीवार यांना मानवस्त्र व ग्रामगीता देऊन सत्कार केला.
ना.मुनगंटीवार यांनी आजपर्यंत राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांचे परिवर्तनशील तसेच ग्रामसुधारणावादी विचार सर्वदूर पोहचविण्याकरिता प्रयत्न केलेले आहे. नागपूर आणि अमरावती विद्यापीठाच्या नामांतराकरिता त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे (प्रतिनिधी)

Web Title: Munigantiwar as the Director of Shri Gurudev Seva Mandal