पालिकेने अवैध होर्डिंग हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:25+5:302021-09-24T04:33:25+5:30

घुग्घुस : नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी शेवटच्या दिवशी गावातील अनधिकृत विनापरवानगी ठिकठिकाणी लावलेले पोस्टर, बॅनर काढण्याची ...

The municipality removed the illegal hoardings | पालिकेने अवैध होर्डिंग हटविले

पालिकेने अवैध होर्डिंग हटविले

घुग्घुस : नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवारी शेवटच्या दिवशी गावातील अनधिकृत विनापरवानगी ठिकठिकाणी लावलेले पोस्टर, बॅनर काढण्याची मोहीम राबविण्यात आली.

घुग्घुस नगरपरिषद कार्यालय सर्वेक्षण २०२२ आणि माझी वसुंधरा अभियान २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या दरम्यान गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवून गावातील कचरा साफसफाई करून गोळा करण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांना डस्टबिन देण्यात आल्या. वृक्षारोपण व पर्यावरणविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गाव परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी विनापरवानगीने बॅनर पोस्टर लावण्यात आले होते. ते गुरुवारी हटवून रस्ते, चौक मोकळे करण्यात आले. मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: The municipality removed the illegal hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.