पाणीपट्टी कर वसुलीकरिता नगरपालिकेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:35+5:302021-03-19T04:26:35+5:30
ब्रम्हपुरी : सन २०२० - २१ या आर्थिक वर्षात नळ कनेक्शन धारकांनी पाणी कराची रक्कम भरणा केली नसेल, त्यांनी ...

पाणीपट्टी कर वसुलीकरिता नगरपालिकेची धडक मोहीम
ब्रम्हपुरी : सन २०२० - २१ या आर्थिक वर्षात नळ कनेक्शन धारकांनी पाणी कराची रक्कम भरणा केली नसेल, त्यांनी मागणी देयके मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत व मागणी नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरणा करणे, हे त्या नळ कनेक्शन धारकाचे कर्तव्य आहे. परंतु अजूनही भरणा केला नसेल, अशा नळधारकांचे कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे.
ब्रम्हपुरी नगर परिषदअंतर्गत कनेक्शन नळ कनेक्शनधारकांना वारंवार मागणी बिल व देयके बिल भरणा करण्यासाठी सूचित केले होते. शासनाकडून वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट असल्याने पाणीपट्टी कर देणे हे प्रत्येक नळकनेक्शन धारकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पालिकेने कनेक्शनधारकांकडे बकाया पाणीपट्टी कर तसेच चालू पाणीपट्टी कर थकीत आहे, त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही टाळण्यासाठी पाणीपट्टी कराचा भरणा त्वरित करावा व आपले नळ कनेक्शन कायम ठेवून नगर परिषदेला सहकार्य करावे. अन्यथा नळ कनेक्शन धारकांना त्यांच्या मालमत्ता करावर पाणीपट्टी कराचा बोजा चढवून मासिक दोन टक्के शास्ती लावण्यात येईल, असा इशारा ब्रम्हपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.