शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मनपाने नाकारले दोन हजार लेआऊट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:41 PM

महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीच्या कागदपत्रांसह भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनी त्रुटींची पुर्तता न केल्याने दोन हजार ११६ प्रकरणांना महानगर पालिकेने नाकारले आहे.

ठळक मुद्देगुंठेवारी निकषात बाद : दोन हजार ११६ पैकी ३८१ प्रकरणांवरच होणार सुनावणी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीच्या कागदपत्रांसह भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनी त्रुटींची पुर्तता न केल्याने दोन हजार ११६ प्रकरणांना महानगर पालिकेने नाकारले आहे. तर, केवळ ३८१ पात्र प्रकरणांवर येत्या ९ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे. उर्वरित सर्व अर्जदारांचे लेआऊट्स विकास प्रकल्पांना बाधा आणत असल्याच्या कारणावरून फेटाळले आहे.चंद्रपूर शहरातील २ हजार ११६ भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी महानगर पालिकेत अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये गुंठेवारी कायद्याच्या निकषात न बसणाऱ्या प्रकरणांचीच संख्या अधिक असल्याने दोन हजार भूखंडधारकांचे अर्ज फेटाळण्याची टांगती तलवार कायम असल्याचे भाकित ‘लोकमत’ वर्तविले होते. चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांत आरक्षित जागांवर घरे बांधून निवास करणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. मनपाकडून गृहकर आकारला जात असला, तरी संबंधित भुखंड आणि इमारतींचे अद्याप नियमितीकरण झाले नाही. राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीची कागदपत्रे असलेल्या सर्व भूखंडधारकांचे नियमितीकरण करण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिकेनेही संबंधित भूखंडधारकांकडून विहित प्रपत्रात अर्ज मागविले होते. शहरातील २ हजार ४९७ भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी मनपाकडे अर्ज केले. त्यापैकी ३८१ प्रकरणे गुंठेवारी कायद्यानुसार शहर विकास योजनेला अनुरुप ठरलीत. उर्वरीत २ हजार ११६ प्रकरणे कायद्याच्या निकषांना ठेंगा दाखविणारी होती. त्यामुळे विहित मुदतीत त्रुटी पूर्ण करा, अशी नोटीस भूखंडधारकांना मनपाने पाठविली होती. भूखंडाचे नियमितीकरणासाठी मनपाकडे आलेली तब्बल २ हजार ११६ प्रकरणे शहर विकास योजनेला बाधा आणणारी म्हणजे गुंठेवारी कायद्याच्या निकषात बसणारी नसल्याने भूखंडधारकांचे दावे फेटाळले आहे.काय आहेत कारणे ?भूखंडातील आरक्षित जागेवर अतिक्रमण, आवश्यक रुंदीचा रस्ता न सोडणे, रेल्वेलाईन बासपास रस्ता, परावर्तीत प्लॉट, म्हाडाच्या भूसंपादीत क्षेत्रात घर उभारणे, नझुल शिट भूखंड, खेळाचे मैदान बळकावणे, आवश्यक रुंदीचा रस्ता नसणे, कोळसा व्याप्त क्षेत्रात घर बांधणे, आदी बेकायदेशीर प्रकरणांना महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यातील निकषाने चपराक लावली आहे.‘त्या’ अर्जांचे काय होणार ?ले-आऊट मंजूर असूनही ज्या भूखंडधारकांकडे २००१ नंतरची रजिस्ट्री आहे. अशांना गुंठेवारी कायद्यानुसार यापूर्वी नियमितीकरणाचा लाभ घेता येत होता. नव्या निर्णयानुसार आता २००१ पूवी मंजूर ले-आऊट आणि रजिस्ट्री २००१ नंतर असलेले भूखंड नियमित करता येते. चंद्रपूर शहरातील पूरबाधित क्षेत्रातून (आरक्षित) २०० भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज सादर केले. मात्र, राज्य शासनाने आरक्षण उठविले नाही, तर अर्जदारांचा अपेक्षाभंग होणार आहे.