मामा तलावाचे बिल्टतर्फे खोलीकरण
By Admin | Updated: June 20, 2015 02:04 IST2015-06-20T02:04:42+5:302015-06-20T02:04:42+5:30
बीजीपीपीएल कंपनीच्या सामाजिक दायित्त्व विभागाने शासनाच्या जलशिवार योजनेला हातभार लावण्याच्या

मामा तलावाचे बिल्टतर्फे खोलीकरण
बल्लारपूर : बीजीपीपीएल कंपनीच्या सामाजिक दायित्त्व विभागाने शासनाच्या जलशिवार योजनेला हातभार लावण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील कोर्र्टीमक्ता ग्रामपंचायतीच्या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्याची जबाबदारी घेतली. या योजनेचा शुभारंभ मंगळवारी कोर्टीमक्ता येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, कोर्टीमक्ताचे सरपंच दिलीप सोयाम, उपसरपंच गोविंदा उपरे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी. गजभे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, बीजीपीपीएल कंपनीचे सामाजिक दायित्त्व विभाग प्रमुख नितीन देशमुख, अभियंता मार्टीन बोलगीर, अॅड. गणेश वरवाडे, प्रवीण शिवणकर, अॅड. पवन मेश्राम यांची उपस्थिती होती.
निसर्गाच्या पाण्याची साठवणूक करून सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. यासाठी उद्योगाकडून मदत घेतली जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी बिल्ट उद्योगाने कोर्टिमक्ता येथील मामा तलावाची निवड केली. यासाठी साधन बिल्टने उपलब्ध करून दिले असून इंधन खर्च शासन देत आहे. (शहर प्रतिनिधी)