रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी तुती उत्पादकांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:00+5:302021-01-08T05:34:00+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी निराशा ...

रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी तुती उत्पादकांची कोंडी
चंद्रपूर : जिल्ह्यात तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र, रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी निराशा वाट्याला आली आहे. त्यामुळे तुती उत्पादन करणारे नाईलाजास्तव अन्य व्यवसायाकडे वळताना दिसून येत आहेत.
रेशीम कोष खरेदी केंद्र नसल्याने राज्याबाहेरून रेशीम कोषाची खरेदी केली जाते. टसर उत्पादक शेतकरी आपला माल बंगळुरू येथे विक्रीसाठी नेऊ शकत नाही. बंगळुरू येथून मालाची वाहतूक करताना मनस्ताप होतो. खासगी वाहनाद्वारे हा माल खरेदी केंद्रावर आर्थिक, मानसिक त्रासाबरोबरच मालाच्या दर्जावरही अनिष्ट परिणाम होतो. तत्कालीन भाजप-सेना युती सरकारच्या काळात रेशीम संचालनालयाने सर्व बाबींची अनुकूलता विचारात घेऊन विभागीय रेशीम कार्यालयाच्या सहायक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र २५ जानेवारीला निर्गमित केले होते. त्या पत्रानुसार जिल्हा रेशीम कार्यालयाच्या (पाथरी, जि. चंद्रपूर) सकारात्मक अहवालानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे कोष खरेदी केंद्राकरिता लागणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० स्क्वेअर फूट जागा भाडेपट्टीवर घेण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तुती उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.