मुकुंद पातोंड, रविशंकर पारधी उपविजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:05+5:302021-02-05T07:34:05+5:30
वरोरा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित तथा महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ...

मुकुंद पातोंड, रविशंकर पारधी उपविजेते
वरोरा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित तथा महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन टेबल टेनिस व बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात उपविजेतेपद प्राप्त केले आहे.
दैनंदिन शैक्षणिक, कार्यालयीन तथा प्रशासकीय कामातून विरंगुळा मिळावा, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने कुलगुरू डॉ.व्ही. एस. भाले यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन कृषी विद्यापीठ अकोला येथे करण्यात येते.
त्या अंतर्गत २६ ते २८ जानेवारी, २०२१ या कालावधीत विद्यापीठाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालय संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांकरिता करण्यात आले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये कृषी महाविद्यालय वरोरा येथील डॉ.मुकुंद पातोंड यांनी बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात उपविजेतेपद तर टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात डॉ.रविशंकर पारधी यांनी उपविजेतेपद प्राप्त केले.