गोसेखुर्द प्रकल्पाबाबत खासदारांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:55+5:302021-07-21T04:19:55+5:30
ब्रह्मपुरी: गोसेखुर्द प्रकल्प सावली व ब्रह्मपुरी विभागाची आढावा बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यात खा. नेते ...

गोसेखुर्द प्रकल्पाबाबत खासदारांनी घेतला आढावा
ब्रह्मपुरी: गोसेखुर्द प्रकल्प सावली व ब्रह्मपुरी विभागाची आढावा बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यात खा. नेते यांनी प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली.
या बैठकीत विविध मुद्यांवर माहिती घेण्यात आली. त्यात मुख्य कालव्याचे क्रिटीकल पॅचची कामे, लाभक्षेत्र विकास कामे अजून सुरू होऊ शकले नाही. ते तत्काळ सुरू करावे, पाणीवाटप संस्था स्थापन करून सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करावे, तळोधी खुर्द व मुई येथील शेतकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा, वन्यप्राणी क्राॅसिंगबाबत वन विभागासोबत समन्वय साधून उर्वरित कामे त्वरित पूर्ण करावे, बंद कूपनलिकांचे संथ गतीने काम सुरू आहे, त्याची गती वाढवावी. अशा प्रकारचे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. याप्रसंगी माजी आमदार प्रा. अतुल देशकर, कार्यकारी अभियंता संदीप हसे, कार्यकारी अभियंता सोनुने, सर्व उपविभागीय अभियंता व इतर सर्व अभियंता उपस्थित होते. सदर आढावा बैठकीत जि. प. सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री कृष्णा सहारे, पं. स. सभापती रामलाल दोनाडकर, जि. प. सदस्य दीपाली मेश्राम, पं.स. उपसभापती सुनीता ठवकर, पं.स. सदस्य ममता कुंभारे उपस्थित होते.
200721\img-20210720-wa0133.jpg
आढावा बैठकित खासदार नेते, प्रा. अतुल देशकर व उपस्थित अधिकारी वर्ग