परवानगीअभावी आंदोलन पुढे ढकलले

By Admin | Updated: November 18, 2016 01:00 IST2016-11-18T01:00:08+5:302016-11-18T01:00:08+5:30

जिल्हा सहकारी बँकांमध्ये खातेदार शेतकऱ्यांच्या ५०० रुपये व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Movement pushed forward without permission | परवानगीअभावी आंदोलन पुढे ढकलले

परवानगीअभावी आंदोलन पुढे ढकलले

प्रचंड पोलीस बंदोबस्त : मनपाचे नाहरकत घेण्याचे निर्देश
चंद्रपूर : जिल्हा सहकारी बँकांमध्ये खातेदार शेतकऱ्यांच्या ५०० रुपये व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या निषेधार्थ भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे गुरूवारी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु चंद्रपूर महानगरपालिकेकडून वेळेच्या आता परवानगी न मिळाल्याने हे आंदोलन चार दिवसांवर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे संयोजन बळीराज धोटे यांनी दिली.
५०० व हजाराच्या नोटबंदीमुळे राज्यामध्ये अभूतपूूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जुन्या ५०० व हजाराच्या नोटा जिल्हा सहकारी बँकांना स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने मज्जाव केला आहे. त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेऊन भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे चंद्रपूर येथील जटपुरा गेट येथे गुरूवारी दुपारी आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संयोजक बळीराज धोटे यांच्यासह इतर कार्यकर्ते एकत्र आले होते.
या आंदोलनासाठी संयोजकांनी पोलीस विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी आंदोलनाची परवानगी देण्यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेकडून नाहरकत पत्र घेण्याची अट टाकली. मनपाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची बल्लारपूर येथे निवडणूक ड्युटी लागली आहे. त्यामुळे आंदोलनासाठी मनपाचे नाहरकत पत्र प्राप्त झाले नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याविरोधात आंदोलन होणार असल्याचे प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलक कमी आणि पोलिसांची संख्या अधिक होती. (प्रतिनिधी)

सडके अंडे व टमाटरचा हार
शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेत ५०० व हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार होते. त्यामध्ये राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या फोटोला सडके अंडे व सडक्या टमाटरचा हार घालून या निर्णयाचा निषेध करण्यात येणार होता. आता हे आंदोलन चार दिवसांवर पुढे ढकलण्यात आले आहे.
 

Web Title: Movement pushed forward without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.