चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी तहसीलसमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:24 IST2018-01-29T23:23:39+5:302018-01-29T23:24:01+5:30
चिमूर क्रांती जिल्हा व वेगळा विदर्भ झाला पाहिजे, या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी तहसीलसमोर धरणे आंदोलन
आॅनलाईन लोकमत
चिमूर : चिमूर क्रांती जिल्हा व वेगळा विदर्भ झाला पाहिजे, या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांच्यामार्फतीने निवेदन देण्यात आले.
चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी मागील ४० वर्षांपासून वारंवार केली जात आहे. सरकारचे या चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीकडे लक्ष नाही. यापूर्वी जिल्ह्यासाठी अनेक आंदोलन, उपोषण व मोर्चे काढण्यात आले आहे. तरीही याची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.
या मागणीकडे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी चिमूरच्या स्वातंत्र लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देण्यात आली. या आंदोलनात माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभे, नरेंद्र बंडे, सुनील मैद, गजानन अगडे, बाळू बोभाटे, लता अगडे, सिंधू रामटेके, राजू मुरकुटे, विलास मोहीनकर अविनाश अगडे, कुळसंगे, लिलाताई नंदरधने आदी सहभागी झाले होते. दिवसभर धरणे दिल्यानंतर सायंकाळी उपविभागीय अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.