लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विना परवाना प्रवासी वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स बंद करावे या मागणीसाठी प्रहार वाहन चालक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले.मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुक बंद करावे या करीता सहपरिवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. परिणामी अवैध प्रवासी वाहतुक सुरूच आहे. यामुळे अन्यायग्रस्त वाहन चालक संघटनेने सपत्नीक लोटांगण आंदोलन करून समस्येकडे लक्ष वेधले.
वाहन चालक संघटनेचे लोटांगण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:18 IST