केरोसीन परवानाधारकांचे कचेरीसमोर आंदोलन

By Admin | Updated: October 8, 2015 00:42 IST2015-10-08T00:42:22+5:302015-10-08T00:42:22+5:30

नुकतेच केंद्र आणि राज्य शासनाने गॅस धारकांना रॉकेलचा पुरवठा करायचे नाही, अशा प्रकारचे जनविरोधी निर्णय घेतले आहे.

Movement in front of kerosene licensed workers | केरोसीन परवानाधारकांचे कचेरीसमोर आंदोलन

केरोसीन परवानाधारकांचे कचेरीसमोर आंदोलन

चंद्रपूर : नुकतेच केंद्र आणि राज्य शासनाने गॅस धारकांना रॉकेलचा पुरवठा करायचे नाही, अशा प्रकारचे जनविरोधी निर्णय घेतले आहे. या निर्णयाविरोधात बुधवारी केरोसीन विक्रेत्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
एक गॅस कनेक्शन असणाऱ्या व्यक्तीने गॅससाठी नंबर लावल्यानंतरही चार-पाच दिवस सिलेंडर मिळत नाही, अशा परिस्थित स्वयंपाकासाठी इंधन विकत घेण्यासाठी गेले असता अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. अशा स्थितीत शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे. रॉकेलचा कोटा सध्या असलेल्या कोट्यापैकी ९० टक्के कमी करून फक्त दहा टक्के राकेलचा पुरवठा करण्यात येत आहे. गॅस धारकांना रॉकेलचा पुरवठा न करण्याबाबतचा निर्णयामुळे सामान्य जनतेला अडचणीला तोंड द्यावे लागणार असून केरोसीन परवाना धारकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेऊन रॉकेलचा कोटा पूर्ववत करावा व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनात चंद्रपूर तालुक्यातील ३९० परवाना धारकापैकी २४० परवाना धारक महिला, पुरुष सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष दास, सचिव विजय आंबटकर, नंदू रूखमांग्द, संजीवनी जोशी, रत्नमाला बावणे, शेख मुमताज, राजु येले, शेख कादर सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Movement in front of kerosene licensed workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.