हिरव्या बांबूसाठी कारागिरांचे आंदोलन

By Admin | Updated: December 8, 2014 22:33 IST2014-12-08T22:33:36+5:302014-12-08T22:33:36+5:30

जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही.

Movement of artisans for green bamboo | हिरव्या बांबूसाठी कारागिरांचे आंदोलन

हिरव्या बांबूसाठी कारागिरांचे आंदोलन

चंद्रपूर : जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही. बांबू उपलब्ध करून देण्यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथील कारागीर जंगलातून बाबू आणून कारागिरी करतात. या कारागिरांना वनविभागाचे अधिकाऱ्याकडून त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात बफरचे उपवनसंरक्षक नरवणे यांच्या कार्यालयात बांबूची मागणी व रोजगाराची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. आम्ही कारागीर असुन आमचे काम पहा असे म्हणत कार्यालयासमोरच बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू कारागिरांनी बनविल्या. बनविलेल्या वस्तू डिएफओ नरवणे यांना भेट दिल्या. नरवणे यांनी मोहाळी हे गाव दत्तक घेणार असल्याचे सांगून येथील वस्तूसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी सावली वनपरीक्षेत्रातील बांबू कारागिरांचे एक वर्षापासून बांबू कार्ड न दिल्याने उपवनसंरक्षक पाटील यांचे कार्यालयातही कारागिरांनी गोंधळ झाला. मात्र डिएफओ पाटील हजर नसल्याने सहायक वनसंरक्षक पवार यांनी लवकरात लवकर कार्ड देण्याचे आश्वासन दिले.या आंदोलनात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, शहनाज बेग, पुष्पा नेवारे, छाया सिडाम, सुलेमान बेग, नंदलाल मडावी, मिलींद मडावी, ब्रम्हानंद गेडाम, लिलाबाई मडावी, गिताबाई सिडाम, रेखा सिडाम, संगिता गेडाम, अनिल मडावी, प्रेमदास उईके आदी कार्यकर्ते, कारगीर सहभागी होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Movement of artisans for green bamboo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.