मालमत्ता करवाढीविरोधात आंदोलनच सुुरुच
By Admin | Updated: October 17, 2016 00:46 IST2016-10-17T00:46:45+5:302016-10-17T00:46:45+5:30
महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता करात केलेल्या करवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला आहे.

मालमत्ता करवाढीविरोधात आंदोलनच सुुरुच
चंद्रपूर : महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता करात केलेल्या करवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला आहे. ही करवाढ त्वरित रद्द करण्याच्या विरोधात पक्षातर्फे साखळी उपोषण करण्यात येत आहे. १३ आॅक्टोंबरपासून सुरु केलेले हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु ठेवण्यात आले.
मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्तबोजा पडणार आहे. या करवाढीला आम आदमी पक्षाने विरोध दर्शविला आहे.
नागरिकांवर लादण्यात आलेली ही करवाढ अन्यायकारक असून ती त्वरीत मागे घेण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, यावर प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे या विरोधात पक्षाच्या वतीने साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ आॅक्टोबरपासून गांधी चौक येथील महापालिका इमारतीसमोर या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दुसऱ्या दिवशी संदीप पिंपळकर तर दुसऱ्या दिवशी आपचे विदर्भ प्रतिनिधी सुनील भोयर, विदीशा निमसरकर हे उपोषणात सहभागी झाले होते. १५ आक्टोबरला राजू कुडे हे उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाला चंद्रपूर जिल्हा फूटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अजबराव डंभारे, उपाध्यक्ष मारोतराव दोरखंडे, सहसचिव शेख अशरफी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.तर ४४२ नागरिकांनीही या करवाढीविरोधात आपले नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)