पोलीस पथक ‘सेटिंग’च्या मोहात

By Admin | Updated: August 28, 2015 01:19 IST2015-08-28T01:19:01+5:302015-08-28T01:19:01+5:30

जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर प्रत्येक ठाण्यातील पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व पिणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सतर्क राहावे,

In the motions of the police station 'setting' | पोलीस पथक ‘सेटिंग’च्या मोहात

पोलीस पथक ‘सेटिंग’च्या मोहात

दारूविक्रेत्यांना सहकार्य? : नागरिकांत रोष, तक्रार करायची कुणाकडे ?
शंकर चव्हाण  जिवती
जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर प्रत्येक ठाण्यातील पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर व पिणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सतर्क राहावे, असे जिल्हा पोलीस विभागाचे आदेश आहेत. मात्र जिवती पोलीस दारू विक्रेत्यांकडून स्वत:चे चांगभलं करण्यासाठी दारूविक्री व आयात करण्यासाठी सहकार्य करीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे अनेकाचे संसार उघड्यावर येण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जिवती तालुका हा तेलंगणा राज्यालगत असल्याने येथून मोठ्या प्रमाणात दारूची हेराफेरी होत आहे. तर काही जण केरामेरी, इंदाणी, कोलामा, मेडीगुडा आदी ठिकाणावर जावून आपली तलफ भागवित आहे. या दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी नेहमी पोलीस गस्तीवर असतात. मात्र दारूपिणारा व विकणारा गस्तीतल्या पोलिसांच्या ओळखीचा सापडला की, सेटींग करायलाही वेळ लागत नाही. मग दारू कितीही सापडू द्या, थोडीफार दारू दाखवून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा जिवती पोलिसांचा सपाटा सुरु आहे.
अनेक वेळा दारू सापडूनही काहीच हाती लागले नाही, असे सांगून परत केल्याचे नागरिकांकडून कळते. गावात एखाद्याने पोलिसांनी दारू पकडून सोडल्याची बोंब केली की त्यालाही धमकावून गप्प बसविण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे.
पैसे कमविण्याच्या मोहात पडलेले पोलीस कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांचा कसलाही विचार न करता ‘आम्ही जातो, तुम्ही चालवा’ अशी हिरवी झेंडीच दाखविल्याचे चित्र तालुक्यात आहे. त्यामुळे दारू विक्रेतेही बिनधास्तपणे दारू विक्री करीत आहेत.
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारू विक्रीवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असतानाही पोलीस सुस्त का आहेत, पोलिसांना मिळालेली गुप्त माहिती दारूविक्रेत्यांपर्यंत पोहोचते कशी, हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. याकडे एसपींनी लक्ष द्यावे.

Web Title: In the motions of the police station 'setting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.