भिक्षूक महिलेच्या प्रसंगावधानाने वाचली कोवळ्या राधेची अब्रू

By Admin | Updated: September 27, 2014 23:11 IST2014-09-27T23:11:56+5:302014-09-27T23:11:56+5:30

१४ वर्षांच्या अनाथ राधेला आप्तांनी चंद्रपुरात बेवारस स्थितीत सोडून दिले. ती महाकाली मंदिर परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरू लागली. याच दरम्यान काही मानवी श्वापदांची विक्राळ नजर तिच्यावर पडली.

The mother of the monk read out of the ruin of Radha | भिक्षूक महिलेच्या प्रसंगावधानाने वाचली कोवळ्या राधेची अब्रू

भिक्षूक महिलेच्या प्रसंगावधानाने वाचली कोवळ्या राधेची अब्रू

आप्तांनी सोडले बेवारस : अनाथ मुलगी पोलिसांच्या ताब्यात
संतोष कुंडकर - चंद्रपूर
१४ वर्षांच्या अनाथ राधेला आप्तांनी चंद्रपुरात बेवारस स्थितीत सोडून दिले. ती महाकाली मंदिर परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरू लागली. याच दरम्यान काही मानवी श्वापदांची विक्राळ नजर तिच्यावर पडली. तिच्या देहाचे लचके तोडण्याच्या तयारीत ही श्वापदं असतानाच, एका भिकारी महिलेने तिला सुरक्षा दिली अन् संभावित अत्याचारातून राधेला मुक्ती मिळाली. आता ही अनाथ राधा पोलिसांच्या ताब्यात आहे.
राधा (काल्पनिक नाव) ही मुळची राजुरा तालुक्यातील वरुर येथील रहिवासी. आई-वडिलांच्या छत्रछायेत वाढत असताना वडिलांनी अचानक दुसरे लग्न केले. मग ती आईसोबत राहू लागली. मात्र तिच्या प्राक्तनात वेगळेच काही लिहून होते. मोलमजुरी करून घास भरविणाऱ्या तिच्या आईने तीन वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला अन् राधा एकाकी झाली. मात्र काकाने तिला आश्रय दिला. काही दिवस राधा तेथे गुण्यागोविंदाने राहीली. परंतु नंतर काकाच्या घरातही तिचा छळ होऊ लागला. लहान-सहान कारणावरून तिला मारहाण केली जात असे. पुढे काकानेही तिला तिच्या आईच्या आप्तांकडे सातरी (चनाखा) या गावी नेऊन सोडले. तेथे राधाच्या आईचे मामा वास्तव्याला आहेत. येथे आल्यानंतरही राधेचा ‘वनवास’ संपला नाही. या ठिकाणीही तिला केवळ दोन दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर आईच्या मामाच्या मुलाने १५ दिवसांपूर्वी राधेला चंद्रपूर येथे आणून महाकाली मंदिर परिसरात बेवारस स्थितीत सोडले. आप्तांपासून तुटलेल्या राधेला आता भिक्षा मागून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांपुढे हात पसरून ती जगण्यासाठी ‘दान’ मागू लागली. कुणी एक रुपया...कुणी..दोन रुपये तर कुणी पाच रुपये तिच्या हातावर ठेवत. त्यातून ती दोनवेळच्या जेवणाची तजवीज करीत होती. रात्री त्याच परिसरातील शनी मंदिरालगत अन्य भिक्षूकांसोबत ती देखील रात्रं काढत होती. अशातच या परिसरात भटकणाऱ्या काही भंगार चोरांची नजर तिच्या कोवळ्या देहावर पडली. ती जाईल तिथे तिच्या मागे जाणे, अश्लिल इशारे करणे, असा प्रकार सुरू झाला. ते राधेचा पिच्छा पुरवत होते. तिच्यावर अत्याचार करण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र केवळ नशिब बलवत्तर म्हणून अब्रु वाचली.
लक्ष्मी आणि पोलीस ठरले देव
काही टारगट युवक राधेच्या मागे लागले असल्याची कुणकुण लक्ष्मी नामक भिक्षूक महिलेला लागली. १२ दिवसांपूर्वी ही बाब लक्ष्मीच्या ध्यानात आली. तिने लगेच राधेला सोबत ठेवणे सुरू केले. या दरम्यान, महाकाली मंदिर परिसरातील एका पानटपरी चालकाला हा प्रकार लक्षात आला. त्याने लगेच महाकाली पोलीस चौकीला घडत असलेल्या प्रकाराबाबत अवगत केले. पोलिसांनीही सदर बाब गांभिर्याने घेतली. पोलीस जमादार प्रमोद चिंचोळकर व शिपाई विनायक दुर्वे यांनी महाकाली मंदिर परिसरात जाऊन अनाथ राधाला ताब्यात घेतले.

Web Title: The mother of the monk read out of the ruin of Radha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.