रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:50+5:302021-07-19T04:18:50+5:30

विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून ...

Most weddings passed on Sunday | रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने

रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने

विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे. रविवारी शहरातील लाॅन, मंगल कार्यालये, हाॅटेल आदींमध्ये विवाह सोहळे पार पडले. सकाळच्या वेळी जिकडे जितके बॅण्डचा आवाज गुंजत होता. यामुळे मंगल कार्यालय संचालकांसह, बॅण्ड पथक, कॅटरर्स आदींचा काही प्रमाणात का होईना, फायदा झाला. चंद्रपूर येथील दाताळा मार्ग, नागपूर रोडवरील मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये सर्वाधिक लग्ने पार पडली.

बाॅक्स

आषाढामध्ये विवाह?

आषाढ महिना हा पावसाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये बहुतांश जण कार्यक्रम करण्याचे टाळतात. मात्र या वर्षी इलाज नसल्यामुळे लग्न समारंभ आषाढ महिन्यात पार पाडले जात आहेत.

बाॅक्स

कोरोना नियम पायदळी

कोरोना संकटामुळे शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेशिवाय इतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विशेषत: सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंतच बाजार सुरू असतो. असे असले तरी रविवारी पार पडलेल्या लग्नसमंभामध्ये मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली. विशेषत : अनेकांनी मास्कसुुद्धा लावले नव्हते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: Most weddings passed on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.