शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

२00९ मध्ये जाळले सर्वाधिक वाहने

By admin | Updated: May 10, 2014 00:27 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते. हे वर्ष पोलीस दलासाठीही काळ वर्षच ठरले होते.१९८९ मध्ये नक्षल्यांनी ३ ट्रक, २ ट्रॅक्टर व एक मेटॅडोर अशी सहा वाहनांची जाळपोळ करून १४ लक्ष ६४ हजार ८६६ रुपयांचे नुकसान केले. १९९0 मध्ये १९ लक्ष ६५ हजार रुपयांची ९ वाहने, १९९१ मध्ये १७ लक्ष ४१ हजार रुपयांची ९ वाहने, १९९२ मध्ये २५ लक्ष २ हजार रुपयांची ९ वाहने, १९९३ मध्ये १४ लक्ष ५७ हजार रुपयांची १३ वाहने, १९९४ मध्ये ४२ लक्ष ७५ हजार रुपयांची १९ वाहने, १९९५ मध्ये ३ लक्ष रुपयांचा एक ट्रक, १९९६ मध्ये ६७ लक्ष ९0 हजार ६00 रुपयांची १८ वाहने, १९९७ मध्ये ३३ लक्ष ७५ हजार रुपयांची १0 वाहने, १९९८ मध्ये ३४लक्ष १0 हजार रुपयांची १७ वाहने, १९९९ मध्ये २८ लक्ष ५0 हजार रुपयांची ११ वाहने, २000 मध्ये १२ लक्ष ९0 हजार रुपयांची ४ वाहने, २00१ मध्ये ४८ लक्ष ७४ हजार रुपयांची १७ वाहने, २00२ मध्ये ५४ लक्ष ३0 हजार रुपयांची १४ वाहने, २00३ मध्ये ६९ लक्ष ७0 हजार रुपयांची २0 वाहने, २00४ मध्ये ४८ लक्ष २९ हजार रुपयांची १२ वाहने, २00५ मध्ये ५४ लक्ष २१ हजार रुपयांची १९ वाहने, २00६ मध्ये ८६ लक्ष १२ हजार रुपयांची २६ वाहने, २00७ मध्ये ३८ लक्ष ९२ हजार रुपयांची १३ वाहने, २00८ मध्ये १ कोटी ३१ लक्ष २0 हजार ५७७ रुपयांची २८ वाहने, २00९ मध्ये २ कोटी २८ लक्ष ६७ हजार ५0९ रुपयांची ४३ वाहने, २0१0 मध्ये ५४ लक्ष २८ हजार २६७ रुपयांची १५ वाहने, २0११ मध्ये ९0 लक्ष ९ हजार रुपयांची ३0 वाहने, २0१२ मध्ये ६८ लक्ष ७१ हजार रुपयांची १९ वाहने, २0१३ मध्ये १ कोटी १९ लक्ष ६५ हजार ५५0 रुपयांची २८ वाहने आणि यावर्षी ३0 एप्रिल २0१४ पयर्ंत १ कोटी ३१ लक्ष रुपयांची ७ वाहने भस्मसात केली. यात १0३ ट्रक, १५१ ट्रॅक्टर, २६ रोड रोलर, ३३ टिप्पर यासह जेसीबी मशीन, ट्रॉली, पोकलँड मशीन, टँकर, जीप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अशा १0४ वाहनांसह एकूण ४१७ वाहनांचा समावेश आहे.नक्षलवादी सध्याही जाळपोळीच्या घटना घडवित आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात रस्ते व पुल होऊ नये या करिता विकासकामे बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. शासनाने मध्यंतरी कंत्राटदारांना बांधकामस्थळावर सुरक्षा पुरविण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही जाळपोळीच्या घटना बंद झाल्या नाही. (शहर प्रतिनिधी)