ब्रह्मपुरी राज्यात सर्वाधिक हॉट; पारा ४८.१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:25 IST2019-06-07T11:24:46+5:302019-06-07T11:25:14+5:30

गुरुवारी ब्रह्मपुरीत ४८.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. हे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यातील राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

Most hot in Brahmapuri in State; Mercury at 48.1 | ब्रह्मपुरी राज्यात सर्वाधिक हॉट; पारा ४८.१ वर

ब्रह्मपुरी राज्यात सर्वाधिक हॉट; पारा ४८.१ वर

ठळक मुद्दे चंद्रपूर ४७.२

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जून महिन्याचा पहिला आठवडा लोटत चालला असला तरी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान कमी व्हायला तयार नाही. गुरुवारी ब्रह्मपुरीत ४८.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. हे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यातील राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. यासोबतच चंद्रपुरात गुरुवारी ४७.२ अंश सेल्सीयस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून चंद्रपूर जिल्हा वाढत्या तापमानामुळे होरपळून निघत आहे. सोमवारी व मंगळवारचे ढगाळ वातावरण सोडले तर सुर्याचा पारा अविरत ४५ अंशापार जात आहे.

Web Title: Most hot in Brahmapuri in State; Mercury at 48.1