गोल बाजारात सर्वाधिक वर्दळ; वाहनाच्या गर्दीत चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:51+5:302021-07-21T04:19:51+5:30

चंद्रपूर : शहरातील गोलबाजारात हातठेले, छोटे-मोठे व्यापारी, आदींनी आपले प्रतिष्ठान थाटले आहे. त्यातच हा शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने येथे ...

The most bustling in the round market; How to walk in a crowd of vehicles? | गोल बाजारात सर्वाधिक वर्दळ; वाहनाच्या गर्दीत चालायचे कसे?

गोल बाजारात सर्वाधिक वर्दळ; वाहनाच्या गर्दीत चालायचे कसे?

चंद्रपूर : शहरातील गोलबाजारात हातठेले, छोटे-मोठे व्यापारी, आदींनी आपले प्रतिष्ठान थाटले आहे. त्यातच हा शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने येथे विक्रेते व ग्राहकांची मोठी वर्दळ असते. मात्र त्या तुलनेत हा मार्ग अरुंद आहे. येथून अनेक दुचाकी जात असतात. त्यातच हा शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने येथे विक्रेते व

ग्राहकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पायी जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. चंद्रपूर शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यामुळे येथील प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातील शहरातील बाजार हा गोलबाजार व गंजवॉर्ड येथे भरत असतो. येथील गोलबाजारात भाजीपाला, फळे यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत असतात. त्यामुळे शहरातील नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करीत असतात. येथे वाहने पार्किंग करण्याची सोय नसल्याने वाहनधारक चक्क बाजारपेठेतच वाहन घेऊन जात असतात. त्यामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत असते. परिणामी पायी जाणाऱ्यांना मार्ग शोधत जावे लागते. या बाजारापासून १०० मीटर अंतरावर महानगरपालिका आहे. मात्र त्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते.

बॉक्स

रोज लाखो लोकांची ये-जा

गोलबाजार हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे. येथे दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू विक्रीचे दुकाने असतात. त्यामुळे शहरातील बहुतेकजण येथेच खरेदी करायला येत असतात. रोज लाखो लोक येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बॉक्स

फूटपाथ कागदावरच

शहरातील मुख्य मार्गावर फूटपाथ तयार करण्यात आला आहे. मात्र यावर छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी तसेच हातठेलेवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यातच ग्राहकांची येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने शहरातील फूटपाथ केवळ कागदावरच दिसून येतात.

बॉक्स

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

अतिक्रमणाबाबत आवाज उठविल्यास पालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली जाते; परंतु त्यानंतर पुन्हा तिथे जैसे थे अतिक्रमण दिसून येते. त्यामुळे ही मोहीम केवळ नावालाच होत असल्याचे दिसून येते.

बॉक्स

चालायला भीती

शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी असते. दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात अनेकजण भरधाव वेगाने वाहने पळवत असल्याने रस्त्यावरून चालायला भीती वाटते.

- संघमित्रा रायपुरे

-------

गोलबाजारात केव्हाही गेले तरी प्रचंड गर्दी असते. परंतु, घराजवळून ते जवळ पडत असल्याने तेथे खरेदीस जात आहे. येथे वाहने घेऊन सर्वजण खरेदीसाठी येत असल्याने चालण्यासही भीती वाटत असते.

- सरिता खडसे

-----

गोलबाजार परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्वजण वाहन घेऊनच बाजारात जातात. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे गोलबाजारात फ्री पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे.

- माधुरी तुम्मे

Web Title: The most bustling in the round market; How to walk in a crowd of vehicles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.