स्थिती बदलत असल्याने मार्निंग वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू असतानाच दिवाळी यंदाची टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन म्हणून ...

Morning walk as conditions change | स्थिती बदलत असल्याने मार्निंग वॉक

स्थिती बदलत असल्याने मार्निंग वॉक

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती कायम, किल्ल्याबाहेरील परिसराला सर्वाधिक पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू असतानाच दिवाळी यंदाची टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन म्हणून नागरिकांनी मार्निंग वॉकला मुरळ घातली होती. परंतु, थोडी परिस्थिती बदलत असल्याचे पाहून काही नागरिक, युवक मास्क लावून सकाळी फिरायला जाणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाविरूद्ध लढ्याचे तर आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठ मार्निंग वॉक करणे हा सोपा पर्याय असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहेत. शहराबाहेरील रस्ते फिरायला जाणाऱ्यांसाठी सोयीचे आहेत. या रस्त्याने फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. किल्ल्याबाहेरील परिसराला तर मॉर्निक वॉक करणारे जास्त पसंती देतात. सकाळी वाहनांचा अजिबात त्रास नसतो. पठापुरा गेटबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली. काही व्यक्ती योगासने करतात.
या ठिकाणी असलेल्या सभागृहात अनेकजण अन्य व्यायामही करतात. रेल्वेस्टेशनकडे फिरायला जाणारेही बरेच आहेत. शहरातील विविध प्रभागात तयार केलेल्या मनपाच्या बगिचांमध्ये फिरून मोकळा श्वास घेतात. पण, कोरोनाची धास्ती असल्याने मार्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या अजुनही लक्षवेधी झाली नाही.

कोरोनाचा विसर नको
परसोडी रस्त्यावर काही व्यक्ती सकाळी फिरताना दिसतात. यात युवकांची संख्या जास्त दिसते. कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही. त्यामुळे मॉर्निंग वाक करताना मॉस्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे. याचा विसर झाल्यास कोरोनाविरूद्धची लढाई यशस्वी होऊ शकणार नाही.

Web Title: Morning walk as conditions change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.