कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:11+5:302021-06-25T04:21:11+5:30

जिल्ह्यात बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ७, बल्लारपूर १, मूल २, पोंभूर्णा १, गोंडपिपरी १ व राजुरा ...

More people recover than corona sufferers | कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Next

जिल्ह्यात बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ७, बल्लारपूर १, मूल २, पोंभूर्णा १, गोंडपिपरी १ व राजुरा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील १ महिला, तर वणी-यवतमाळ येथील १ महिलेचा समावेश आहे. चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, चिमूर, वरोरा, कोरपना व जिवती तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात ५४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बाधितांची संख्या ८४ हजार ६०५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ५४९ झालीे. ५४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ४५ हजार २३४ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ४ लाख ५७ हजार ८१२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५२४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे, त्रिसूत्रीचे पालन करावे, कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: More people recover than corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.