बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:42+5:30

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती.

More emphasis on cleanliness in Ballarpur | बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता दक्षता घेण्यात स्वच्छतेला सर्वात अधिक महत्त्व आहे. या संदर्भात महत्वाची बाब अशी, स्वच्छ भारत अभियान देशभरात जोरात चालले. गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता अभियान ज्या ज्या गाव-शहरांनी चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रात राबविले. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला.
बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती. पावसाळ्यात तर अशा रस्त्याने जाणे कठीण झाले होते. स्वच्छता अभियान सुरू झाले, नगर पालिकेने त्याकडे विशेष लक्ष दिले. घर तेथे शौचालय असायालाच हवे, हा नियम केला. नागरिकांना त्याकरिता प्रेरित केले. वार्डामध्ये पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालय बांधले आणि उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. याकरिता नगरपालिका प्रशासनाला कडक व्हावे लागले. त्याचा चांगला परिणाम झाला. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली. लहान मुलही कुठे उघड्यावर बसल्याचे येथे आज दिसून येत नाही. यासोबतच, घर-परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले. घरचा कचरा संकलित करण्याकरिता सर्व घरी कचराकुंडी दिल्या. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व सुंदर झाले. स्वच्छतेचे मोल नागरिकांच्या लक्षात आले. यामुळेच, कोरोना प्रसंगी नागरिकांना स्वच्छतेवर भर द्या,असे जबरीने सांगण्याची वेळ आली नाही. नागरिक सॅनिटायझरचा वापर स्वयंस्फूर्तीने करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा शहरात फायदा झाला आहे.

पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता सुरू
पावसात अस्वच्छतेमुळे ताप, मलेरिया पोटांचे विकार विविध रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, पावसाचे दिवसात स्वच्छतेकडे लक्ष देणे, गाव स्वच्छ ठेवणे आवश्यक झाले आहे. बल्लारपूर नगर पालिकेने त्याची तयारी सुरू केली असून मोठया नाल्या व शहराअंतर्गत लहान लहान नाल्यांच्या सफाईचे काम सुरु केले आहे. तद्वतच, कोरोनामुळे शहरात निजंर्तुकरणावरही भर देण्यात येत असल्याचे बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुगधा यांनी सांगितले.

 

Web Title: More emphasis on cleanliness in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.