आणखी मागितली मुदतवाढ
By Admin | Updated: December 6, 2014 22:44 IST2014-12-06T22:44:38+5:302014-12-06T22:44:38+5:30
बचतगटांची थकित असलेली रक्कम ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेने १५ जानेवारीपर्यंत न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे.

आणखी मागितली मुदतवाढ
जिल्हा परिषद : बचत गटांची थकीत रकमेचे प्रकरण
चंद्रपूर : बचतगटांची थकित असलेली रक्कम ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेने १५ जानेवारीपर्यंत न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई काही दिवसासाठी टळली.
२००३-०४ मध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे कंत्राट चार बचत गटांना देण्यात आले. मात्र या कंत्राटाचे पूर्ण देयक अदा करण्यात आले नाही. त्यामुळे बचत गटांनी न्यायालयात धाव घेतली.
चार बचत गटांनी गणवेशची शिलाई करून गणवेश जिल्हा परिषदेला सुपूर्द केले व आपली रक्कम अदा करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेने ६ लाख ३१ हजार ३४७ रुपयेच जवळ असल्याने ते बचत गटांना दिले. उर्वरित दोन लाख २८ हजार रुपयांची रक्कम मिळण्यासाठी बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. परंतु २००७ पर्यंत ही रक्कम बचत गटांना मिळाली नाही. त्यानंतर बचत गटांनी चंद्रपूरच्या न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, न्यायालयाने मागील वर्षी एक आदेश देत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेली रक्कम द्यावे, असे सूचविले होते. परंतु बचत गटांना ही रक्कम मिळाली नसल्याने न्यायालयात धाव घेतली व रक्कम मिळण्यासाठी विनंती केली. न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी जप्तीचे आदेश काढले. त्यानंतर ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेले रक्कम अदा करावी, असे निर्देश दिले आहे. दरम्यान आणखी जिल्हा परिषदेने मुदतवाढ मागितली आहे. (शहर प्रतिनिधी)