श्रमिक एल्गारचा पोंभुर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: May 14, 2015 01:37 IST2015-05-14T01:37:57+5:302015-05-14T01:37:57+5:30

तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची एक वर्षापासूनची थकीत मजुरी देण्यात यावी, निराधारांचे ३ महीण्यापासूनचे अनुदान तत्काळ अदा करून...

Morcha of Worker Elgar's Pobhurna Tehsil office | श्रमिक एल्गारचा पोंभुर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा

श्रमिक एल्गारचा पोंभुर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा

पोंभुर्णा : तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची एक वर्षापासूनची थकीत मजुरी देण्यात यावी, निराधारांचे ३ महीण्यापासूनचे अनुदान तत्काळ अदा करून अनुदान दरमहा देण्यात यावे, निराधारांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावे, अन्न सुरक्षा योजनेत गरजुंना समाविष्ठ करावे, एपीएलधारकांना धान्याचा पुरवठा करावा, निराधारांना दरमहा दीड हजार रुपए देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार सरवदे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले व निराधारांचे अनुदान एका आठवड्यात देण्याचे आश्वासन दिले. तर इतर मागण्यांबाबतही सकारात्मक आश्वासन दिले. मोर्चात श्रमीक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, विजय कोरेवार, प्रवीण चिचघरे, घनश्याम मेश्राम, संगीता गेडाम, परशुराम बोरकुटे, विनोद मारशेटीवार, कपिला भसारकर, यमराज बोदलकर, पुष्पा अलाम, उषा अलाम, किरण शेंडे, संगीता कोडापे, छाया जनगमवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Morcha of Worker Elgar's Pobhurna Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.