चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:17 IST2018-12-11T13:17:09+5:302018-12-11T14:17:35+5:30
येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात भन्तेजी ठार
चंद्रपूर: येथील रामदेगीनजिकच्या डोंगरावर असलेल्या संघरामगिरी या ठिकाणच्या विहार परिसरात ध्यानस्थ बसलेल्या भन्ते राहुल यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भन्ते राहुल चिमूर तालुक्यातील वन परिक्षेत्र बफर खडसंगी अंतर्गत येणाºया बौद्धधर्मियांचे श्रद्धा स्थान असलेल्या संघराम गिरी येथे साधना करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून भन्ते राहुल बोधी याना ठार मारल्याची घटना आज सकाळी ११ वाजता दरम्यान घडली
ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या बफर झोन कंपार्टमेंट क्रमांक ६० च्या हद्दीत मंगळवारच्या सकाळी ११ वाजत्या दरम्यान मागील काही दिवसांपासून संघराम गिरी येथे काही भन्ते अधिष्ठान करत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून भन्ते राहुल बोधी यांच्या नरडीचा घोट घेतला.
सोबत अधिष्ठान करीत असलेल्या भन्तेला ही घटना दिसताच त्यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत बिबट्याने आपला डाव साधला होता
घटनेची माहिती मिळताच खडसंगी बफर झोनचे वन अधिकारी दुर्गेकार आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करीत आहेत.
काल झालेल्या घटनेची शाही वाळत नाही तोच २४ तासाच्या आत झालेल्या या हल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे
भन्तेजीवर झालेल्या हल्ल्याची माहिती परिसरात मिळताच अनेकांनी येथे धाव घेतली असून भन्तेजींच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष उल्लेखनीय असे की, काल सोमवारी याच परिसरात बिबट्याने एका दुकानदारावर हल्ला चढवून त्याला ठार केले होते.