शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार ठरला ‘घातवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:01 IST

ताडोबा परिसरात बिबट्याचा मृत्यू, ब्रह्मपुरीतील अपघातात भिवापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, कोठारीत मिनिडोर उलटून आठजण जखमी, तळोधीत बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, भद्रावतीत प्रेयसीवर अत्याचार आणि ट्रकची बसला धडक या घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे सोमवार हा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला.

ठळक मुद्देदुर्गापुरात हत्या, चेकठाण्यात ट्रकने दोघांना चिरडले : वाघाची शिकार, बिबट्याचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर सोमवार हा दिवस आज जिल्ह्यासाठी ‘घातवार’ झाला. जिल्ह्यातील विविध भागात या घटना घडल्या. यात सावली तालुक्यातील कापसी येथे वाघाची शिकार, पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे हायवा ट्रकने दोघांना चिरडले, दुर्गापुरात मामानेच केली भाच्याची हत्या, राजुऱ्यात पोलीस शिपायाची आत्महत्या, बल्लारपुरात मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, ताडोबा परिसरात बिबट्याचा मृत्यू, ब्रह्मपुरीतील अपघातात भिवापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, कोठारीत मिनिडोर उलटून आठजण जखमी, तळोधीत बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, भद्रावतीत प्रेयसीवर अत्याचार आणि ट्रकची बसला धडक या घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे सोमवार हा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला. 

कोठारी : बल्लारपूरकडून गोंडपिपरी येथे बाजारात भाजीपाला विकण्यासाठी जात असलेले मिनिडोर वाहन कोठारीजवळ देवई फाट्याजवळ उलटले. या अपघातात चालकासह आठ जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.गोंडपिपरी येथे बाजार असल्याने बाजारात भाजीपाला विक्रीकरिता मिनिडोर (क्र. एम एच ३४ बीजी ६६१३ ) जात होते.कोठारीजवळील देवई फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व मिनिडोर वाहन उलटले. या अपघातात चालक सिन्नु रा. बल्लारपूर, किशोर मोहुर्ले, राजु मोहुर्ले, राहुल मोहुर्ले रा. कोठारी, पंकज हजारे, बुध्दीलाल चिवडेवाला, राकेश जैन व पम्मी शेख जखमी झाले. जखमींना कोठारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.गाडीतील भाजीपाला अस्ताव्यस्त विखुरला. जखमी रस्त्याच्या कडेला पडले होते. त्याच क्षणी प्रजासत्ताकाचा कार्यक्रम करून परत येत असलेले अभय बुटले या शिक्षकाला ते दिसले. त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखाण्यात आणण्यास मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात