सोमवार ठरला ‘घातवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:01:36+5:30

ताडोबा परिसरात बिबट्याचा मृत्यू, ब्रह्मपुरीतील अपघातात भिवापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, कोठारीत मिनिडोर उलटून आठजण जखमी, तळोधीत बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, भद्रावतीत प्रेयसीवर अत्याचार आणि ट्रकची बसला धडक या घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे सोमवार हा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला.

Monday marks 'fatal' | सोमवार ठरला ‘घातवार’

सोमवार ठरला ‘घातवार’

Next
ठळक मुद्देदुर्गापुरात हत्या, चेकठाण्यात ट्रकने दोघांना चिरडले : वाघाची शिकार, बिबट्याचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर सोमवार हा दिवस आज जिल्ह्यासाठी ‘घातवार’ झाला. जिल्ह्यातील विविध भागात या घटना घडल्या. यात सावली तालुक्यातील कापसी येथे वाघाची शिकार, पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे हायवा ट्रकने दोघांना चिरडले, दुर्गापुरात मामानेच केली भाच्याची हत्या, राजुऱ्यात पोलीस शिपायाची आत्महत्या, बल्लारपुरात मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, ताडोबा परिसरात बिबट्याचा मृत्यू, ब्रह्मपुरीतील अपघातात भिवापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, कोठारीत मिनिडोर उलटून आठजण जखमी, तळोधीत बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, भद्रावतीत प्रेयसीवर अत्याचार आणि ट्रकची बसला धडक या घटनांचा समावेश आहे. या घटनांमुळे सोमवार हा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला.
 

कोठारी : बल्लारपूरकडून गोंडपिपरी येथे बाजारात भाजीपाला विकण्यासाठी जात असलेले मिनिडोर वाहन कोठारीजवळ देवई फाट्याजवळ उलटले. या अपघातात चालकासह आठ जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
गोंडपिपरी येथे बाजार असल्याने बाजारात भाजीपाला विक्रीकरिता मिनिडोर (क्र. एम एच ३४ बीजी ६६१३ ) जात होते.
कोठारीजवळील देवई फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व मिनिडोर वाहन उलटले. या अपघातात चालक सिन्नु रा. बल्लारपूर, किशोर मोहुर्ले, राजु मोहुर्ले, राहुल मोहुर्ले रा. कोठारी, पंकज हजारे, बुध्दीलाल चिवडेवाला, राकेश जैन व पम्मी शेख जखमी झाले. जखमींना कोठारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.
गाडीतील भाजीपाला अस्ताव्यस्त विखुरला. जखमी रस्त्याच्या कडेला पडले होते. त्याच क्षणी प्रजासत्ताकाचा कार्यक्रम करून परत येत असलेले अभय बुटले या शिक्षकाला ते दिसले. त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखाण्यात आणण्यास मदत केली.

Web Title: Monday marks 'fatal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात