भद्रावती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST2021-03-04T04:52:39+5:302021-03-04T04:52:39+5:30
बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्यावर द्विभाजकाच्या मध्यभागी मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात जमावडा असतो. रस्त्यावर येणाऱ्या भरधाव ...

भद्रावती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्यावर द्विभाजकाच्या मध्यभागी मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात जमावडा असतो. रस्त्यावर येणाऱ्या भरधाव वाहनासमोर आल्याने किती अपघात होऊन अनेक कुत्री अपंग झाली आहेत. या घटना लक्षात घेता नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, याबाबतचे निवेदनसुद्धा नगरपालिकेला दिले आहे.
या कुत्र्यांच्या दहशतीमुळे पादचारीसुद्धा भयभीत झाले आहेत. या कुत्र्यांच्या समूहात पाळीव कुत्रीही असतात. असाच प्रकार शहरातील गल्लीबोळातसुद्धा बघावयास मिळत आहे. मोकाट कुत्र्यांनी फेरफटका मारणाऱ्या अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. ही मोकाट कुत्री येऊ नये म्हणून काही नागरिकांनी आपल्या घरासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवल्या आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना पकडण्याची मोहीम व तारीखसुद्धा निश्चित केली होती. मात्र मनेका गांधी यांच्या संस्थेकडून विरोध झाला. एका कुत्र्याच्या मागे शस्त्रक्रियेसाठी ११०० रुपये खर्च येतो. आर्थिकदृष्ट्या नगरपालिकेला ते आताच शक्य नाही. पहिले कोरोनाच्या विविध कार्यक्रमाकरिता काही निधी राखून ठेवला आहे.
- अनिल धानोरकर नगराध्यक्ष नगर परिषद, भद्रावती.