अधीक्षक आत्महत्या प्रकरणातील आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:28+5:30

आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मागणी करूनही देण्यात आली नाही.

Mokat accused in Superintendent suicide case | अधीक्षक आत्महत्या प्रकरणातील आरोपी मोकाट

अधीक्षक आत्महत्या प्रकरणातील आरोपी मोकाट

ठळक मुद्देउपोषणाला बसण्याचा इशारा : प्रशासनाला कुटुंबीयांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यातील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळेच्या अधिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी यातील दोषींना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करीत आत्महत्तेस प्रवृत्त करण्याऱ्या सर्वांना तत्काळ अटक करावी, अन्यथा ८ जानेवारीपासून संपूर्ण कुटूंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पिडिताची पत्नी लता सुभाष पवार व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांत सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदनाद्वारे दिले.
आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मागणी करूनही देण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी असलेल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची चौकाशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मात्र या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार आजारी असल्याचे ढोंग करीत आहेत तर दुसरा आरोपी गडचांदूर, जिवती परिसरात राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस प्रशासन त्याला अटक न करता आम्हालाच अटक करण्याबाबत भ्रमणध्वनीव्दारे धमकावत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पिडीताची पत्नी, नातेवाईक तसेच उपस्थित शिष्टमंडळाने दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलनही करण्यात आले. मात्र अद्यापही प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतली नसल्याचे आरोप केला जात आहे.

Web Title: Mokat accused in Superintendent suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.