मोहाडी नलेश्वर तलाव पर्यटकांनी फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:32 IST2021-09-06T04:32:54+5:302021-09-06T04:32:54+5:30
सिंदेवाही : ...

मोहाडी नलेश्वर तलाव पर्यटकांनी फुलले
सिंदेवाही : तालुक्यातील इंग्रजकालीन तलाव मोहाडी नलेश्वर येथे आहे. या परिसरात पावसाळ्यातील पाण्याने तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ग्रामीण भागातील वॉटर फॉलचे दृश्य परिसरातील पर्यटकांना भुरळ घालत आहे. रविवारी हा तलाव पर्यटकांचे गर्दीने फुलला होता.
तालुक्यातील तसेच इतर शहरांतील पर्यटक मंडळी तलावाचे निसर्गरम्य दृश्य व तलावातील पाण्याच्या ओव्हरफ्लोची मजा घेण्याकरिता आले होते. यावेळी अनेकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह सहभोजनाचा आनंद घेतला. या इंग्रजकालीन तलावाला पर्यटनस्थळ घोषित करण्याची मागणी केलेली आहे. तलावाला नहराने जाणे-येणे करताना रस्त्याची दुरवस्था आहे. चारचाकी वाहने जाताना मोठी गैरसोय होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
050921\img_20210905_152138.jpg
निसर्गरम्य नरेश्वर तलाव पर्यटकांनी फुलले