बीएसएनएल मोबाईल संपर्क प्रक्रियेत फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:27+5:302021-01-16T04:33:27+5:30

---- स्वाधार योजना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा चंद्रपूर: जिल्हातील कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ या ...

Modifications in BSNL Mobile Contact Process | बीएसएनएल मोबाईल संपर्क प्रक्रियेत फेरबदल

बीएसएनएल मोबाईल संपर्क प्रक्रियेत फेरबदल

----

स्वाधार योजना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा

चंद्रपूर: जिल्हातील कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेशित अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्याना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेकरिता नविन अर्ज सादर करण्याची व नुतनीकरणाची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी ही असुन विद्यार्थ्यानी मुदतीपूर्व अर्ज सादर करावे, असे अवाहान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

0000

मतदार याद्या अवलोकनासाठी उपलब्ध

चंद्रपूर : जिल्हयांतील राजूरा, चंद्रपूर (अ.जा.), बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर व वरोरा या विधानसभा मतदार संघाच्या १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अद्यावत करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालये, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालये, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयांत मतदारांचे अवलोकनार्थ उपलब्ध करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्व संबंधित मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

---

Web Title: Modifications in BSNL Mobile Contact Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.