चंद्रपूर : मोबाइल क्रांतीमुळे जग इतके जवळ आले आहे की, आपल्याला जगाच्या कोनाकोपऱ्यातील माहिती एका क्लिकवर सहज मिळत आहे. मोबाइल संवादाचे माध्यम असला तरी याच माध्यमातून आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू घरबसल्या मागवता येत आहे. या मोबाइलचे कित्येक फायदे सांगता येतील. तरीदेखील त्याचा वापर कधी, कुठे व कसा करावा? याची कोणतीही मर्यादा आज राहिलेली नाही. मोबाइलचा अतिरेक आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू लागला आहे.
असे तपासा मोबाइलचे रेडिएशनमोबाइलचे रेडिएशन तुम्हाला तपासायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मोबाइलवरून * #07# हा नंबर डायल करावा लागेल. हा नंबर डायल करताच मोबाइल स्क्रीनवर रेडिएशनशी संबंधित माहिती दिसेल. यामध्ये रेडिएशनची पातळी दोन प्रकारे दाखवली जाते. एक म्हणजे 'डोके' आणि दुसरे 'बॉडी'. डोके म्हणजे फोनवर बोलत असताना मोबाइलच्या रेडिएशनची पातळी काय असते आणि बॉडी म्हणजे फोन वापरताना किंवा खिशात ठेवताना शरीरावर रेडिएशनची पातळी किती असते हे दर्शवते. स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर स्मार्ट उपकरणांचे रेडिएशन १.६ प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त नसावे. असे असेल तर संबंधित उपकरण आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
रेडिएशन समस्या..मोबाइलची समस्या म्हणजे रेडिएशन. वापरत असलेले मोबाइल फोन एका विशिष्ट प्रकारच्या लहरी उत्सर्जित करतात, ज्या शरीरासाठी हानिकारक मानल्या जातात. मोबाइल रेडिएशनमुळे मानसिक नैराश्य येऊ शकते. डोळ्यांच्या समस्या, ताणतणाव येऊ शकतो व ऐकण्याच्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
मोबाईल वापरण्यापूर्वी ही काळजी घ्याच...
- मोबाइल फोनचा गरजेपुरताच वापर करा. त्यासाठी स्वतःला आवरा सततच्या सफिंगमुळे मोबाइल अधिक प्रमाणात तापू शकतो. मोबाइल फोन तापणार नाही याची काळजी घ्या. गरज नसताना मोबाइलमधील इंटरनेट बंद ठेवा.
- मोबाइल फोनसाठी त्याच मोबाइलचा चार्जर वापरा अन्य कोणत्याही कंपन्यांचा चार्जर वापरू नका. संबंधित कंपनीचाच असावा. मोबाइलचा वापर कमीत कमी करा